Additional information
लेखक | रवींद्र पांढरे |
---|---|
पृष्ठसंख्या | 144 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
नातेसंबंध, श्रद्धा-अंधश्रद्धा, नीती अनीती, पाप-पुण्य या संबंधातल्या परंपरागत समजुती – गैरसमजुतींच्या ओझ्याखाली दबून ग्रामीण समाजजीवन पार गुंतागुंतीचं झालं आहे. अशा समाजात जगताना माणसांची, विशेषत: ज्यांचं आत्मभान पुरेसं विकसित झालेलं नाही, जी हतबल, असहाय म्हणून पोरकी आहेत अशा माणसांची पुरती दमछाक होते. अशा पोरक्या माणसांविषयी वाटणाऱ्या प्रामाणिक कळवळ्यातून साकारलेल्या या कथा आहेत.
पोरक्या माणसांच्या जगण्यातील समस्या, व्यथा नाना तऱ्हेच्या. म्हणून कथांची अभिव्यक्तीही नानाविध. असे असले तरी खेडं हेच केंद्र व ग्रामीण समाजजीवन हीच पार्श्वभूमी असल्याने सर्व कथांमधून एकतानता अनुभवता येते. अपवाद वगळता संवादासाठी परिसरातील ‘खान्देशी (जामनेरी) ‘बोली’ चा वापर केल्यामुळे पात्रं सजीव साकार व पात्रांच्या व्यथा बोलक्या, गहिऱ्या झाल्या आहेत.
समाजात असूनही नसल्यासारख्या आणि वाट्याला आलेले वा लादलेले भोग भोगणे हेच ज्यांचं भागधेय आहे अशा पोरक्या माणसांचं भावविश्व संवेदनशीलतेने उलगडून दाखवणाऱ्या या कथा समाजजीवनाचा अंधारा कोपरा उजळून टाकतात म्हणून महत्त्वाच्या आहेत.
लेखक | रवींद्र पांढरे |
---|---|
पृष्ठसंख्या | 144 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.