Additional information
लेखक | प्रा. डॉ. प्रवीण श्रीकृष्ण बनसोड |
---|---|
पृष्ठसंख्या | 76 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
मानवी जीवनासाठी उपकारक मूल्ये आणि जीवनतत्त्वे एका समूहापुरते, प्रांतापुरते, काळापुरते मर्यादित नसतात, तर ते वैश्विक जनसमूहाच्या हितासाठी निर्माण झालेली असतात. `महात्मेनी चतुर्विधाभूतग्रामा अभय देयावे’ या चक्रधर स्वामींच्या वचनाचा अर्थ स्पष्ट आहे की, जगात अस्तित्वात असलेल्या सर्वांना अभय द्यावे. येथे `अभय’ याचा अर्थच सर्व प्रकारच्या भीतीतून मुक्तता असा आहे, कारण भीतीच सर्व प्रकारच्या गुलामीचे मूळ आहे. म्हणूनच कोणीही व्यक्ती महानुभाव धर्म स्वीकारून त्यानुसार आचरण करू शकत असे. चातुर्वर्ण्यासह स्त्रिया आणि अतिशूद्रांना मुक्त प्रवेश दिल्याने जाती-धर्मातून आलेली कनिष्ठत्वाची भीती चक्रधर स्वामींनी दूर केली. जन्मजात भेदाभेद आणि उच्चनीचता यांचा अंत झाला पाहिजे, हा त्यांचा जीवनव्यवहार होता.
चक्रधर स्वामींच्या या कृतिशील कार्याबद्दल प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी, ”ज्ञानेश्वरांच्या भक्तिपंथाची तुलना रानडे-गोखलेंच्या जातिव्यवस्था चौकटीतील समाजसुधारणेशी करता येईल, तर चक्रधरप्रणीत महानुभाव पंथाची तुलना फुले-आंबेडकरांच्या जातिअंताच्या चळवळीशी” केली पाहिजे, असे म्हटले. यावरून चक्रधर स्वामींचे कृतिशील तत्त्वज्ञान मानवी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाचे होते, हे स्पष्ट होते. त्यामुळेच सर्वज्ञ चक्रधरांना ‘मानवी स्वातंत्र्याचे उद्गाते’, हे नामाभिधान अधिक श्रेयस्कर ठरते.
लेखक | प्रा. डॉ. प्रवीण श्रीकृष्ण बनसोड |
---|---|
पृष्ठसंख्या | 76 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.